श्री मारुति स्तोत्र

Hanuman Stotra written by Sant Ramdas Swami

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती। वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥

महाबळी प्राणदाता सकळा ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥ २॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूर लेपना ॥ ३ ॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

ध्वजाग्रें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्निं देखतां कांपती भयें ॥ ५ ॥

ब्रह्मांडें माईलीं नेणों आंवळे दंतपंगती। नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥ ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू । चंपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटी उड्डाणें झेंपावें उत्तरेकडे। मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती। मनासी टाकिलें

मागें गतीसी तुळणा नसे ॥ १० ॥

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटे ॥ ११ ॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करू शके। तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहता नसे ॥ १२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

पशुवृद्धि पुत्रपौत्र समस्तही। पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही। नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने ॥ १५ ॥

हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी। दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१६॥

रामदासीं अग्रगण्य कपिकुळासि मंडणू । रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥

इति श्रीरामदासकृतंसंकटनिरसनंमारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top